रोहित शर्मा मुंबईच्या संघात नसतानाही कसा फलंदाजीला आला, जाणून घ्या आयपीएलचे नियम

मुंबई : रोहित शर्माला हार्दिकने मुंबईच्या ११ सदस्यीय संघातून बाहेर केले होते. पण तरीही जेव्हा मुंबईचा संघ जेव्हा फलंदाजीला आला तेव्हा रोहित शर्मा सलामीला आल्याचे पाहायला मिळाले. हे नेमकं घडलं तरी कसं, याचा विचार काही जण करत आहेत. पण आयपीएलच्या एका मोठ्या नियमामुळे ही गोष्ट घडली आहे. कारण रोहित पहिल्याच षटकात फलंदाजीला आल्याचे सर्वांनीच यावेळी पाहिले.

मुंबई इंडियन्सने टॉस जिंकल्यावर हार्दिक पंड्याने संघात कोणता बदल करण्या आले आहे हे सांगितले. यावेळी मोहम्मद नबीच्या जागी नमन धीर संघात आल्याचे हार्दिक पंड्याने सांगतिले. त्यावेळी हा एकच मुंबईच्या संघात झाल्याचे सर्वांना वाटले. पण काही वेळाने जेव्हा मुंबई इंडियन्सने आपला संघ सोशल मीडियावर पोस्ट केला, त्यावेळी सर्वांना रोहित शर्मा हा मुंबईच्या ११ सदस्यीय संघात नसल्याचे समजले. त्यानंतर चाहत्यांनी हार्दिकला जोरार ट्रोल करायला सुरुवात केली. पण हा हार्दिक पंड्याचा एक डाव असल्याचे समोर आले.

आयपीएलचा हा नियम आहे तरी काय, जाणून घ्या...

आयपीएलचा एक नवा नियम आहे. त्यानुसार एका खेळाडूला तुम्ही कधीही संघात स्थान देऊ शकता. पण त्यासाठी तुम्हाला संघातील एका खेळाडूला बाहेर काढावे लागते. या नवीन नियमाला इम्पॅक्ट प्लेअर, असे नाव देण्यात आले आहे. या नियमानुसार रोहित शर्मा मुंबईच्या ११ सदस्यीय संघात नसला तरी तो फलंदाजीला येऊ शकला.

मुंबई इंडियन्सने जो आपला संघ जाहीर केला, त्यामध्ये ११ सदस्यीय संघात रोहित शर्माला स्थान दिले नव्हते. पण या ११ खेळाडूंच्या यादीखाली राखीव खेळाडूंची यादी देण्यात आली होती. त्यामध्ये रोहित शर्माचे नाव होते आणि इम्पॅक्ट प्लेअर या नियमानुसार रोहित शर्माला मुंबईने सलामीला पाठवले.

मुंबई इंडियन्सने प्रथम गोलंदाजी करताना केकेआरच्या संघाला सुरुवातीपासून धक्के द्यायला सुरुवात केली. त्यामुळेच मुंबईसमोर खेळत असताना केकेआरच्या संघाला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. मुंबईच्या गोलंदाजांनी यावेळी अचूक आणि भेदक मारा केला. त्यामुळेच मुंबईच्या संघाला केकेआरच्या धावसंख्येला लगाम घालता आला.

अशाच अधिक बातम्या वाचण्यासाठी भेट द्या महाराष्ट्र टाइम्सला. ताज्या बातम्या, शहर, देश, अर्थ, क्रीडा, भविष्य आणि लाइफस्टाईल संदर्भातील सर्व बातम्यांचे अपडेट्स मिळवा. व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी TimesXP ला भेट द्या.

2024-05-03T16:25:54Z dg43tfdfdgfd