मुंबई इंडियन्सच्या संघातून रोहित शर्मा बाहेर, हार्दिक पंड्याने पायावरच धोंडा मारुन घेतला...

मुंबई : रोहित शर्मा हा केकेआरविरुद्धच्या सामन्यात मुंबई इंडियन्सच्या Playing xi मध्ये नसल्याचे आता समोर आले आहे. हार्दिक पंड्याने ही सर्वात मोठी चूक केल्याचे म्हटले जात आहे.

रोहित शर्मा हा गेल्यावर्षापर्यंत मुंबईचा कर्णधार होता. पण हार्दिकने कर्णधारपद भूषवताना आता रोहित शर्मालाचा संघाबाहेर केले आहे. केकेआरच्या सामन्यासाठी हार्दिकने आपला संघ जाहीर केला. यावेळी मुंबईच्या ११ सदस्यांच्या संघात रोहित नसल्याचे पाहायला मिळाले आणि त्यामुळेच सर्वांनाच धक्का बसला. रोहितच्या जागी यावेळी नमन धीरचे नाव दिसत आहे. कदाचित रोहित शर्माला इम्पॅक्ट प्लेअर म्हणून या सामन्यात उतरवले जाऊ शकते. पण रोहित शर्मा हा मुंबईची गोलंदाजी असताना हार्दिकच्या मदतीला यापूर्वी आला होता. पण आा या सामन्यात मात्र तो नसणार आहे.

करो या मरो सामन्यात मुंबईसाठी एक गुड न्यूज आली. मुंबई इंडियन्सने टॉस जिंकला आणि हार्दिक पंड्याने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यासाठी मुंबईच्या संघात एकमेव बदल केल्याचे हार्दिकने यावेळी जाहीर केले. टॉस जिंकल्यावर हार्दिकने आपण प्रथम गोलंदाजी का करणार, याचे कारण सांगितले. त्यानंतर या सामन्यात कोणत्या खेळाडूला संधी दिली, हे हार्दिकने स्पष्ट केले. या सामन्यासाठी मोहम्द नबीला संघाबाहेर करण्यात आले असून त्याच्या जागी नमन धीरला मुंबईच्या संघात स्थान देण्यात आले आहे. नमन धीर हा एक अष्टपैलू खेळाडू आहे, जो ऑफ स्पिन गोलंदाजी करू शकतो आणि धडाकेबाज फलंदाजीही करू शकतो. त्यामुळे त्याला आता रोहितच्या जागी संघात स्थान देण्यात आले आहे. पण रोहितला एम्पॅक्ट खेळाडू म्हणून संघात घेणार की नाही, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असेल.

मुंबईसाठी हा सामना सर्वात महत्वाचा आहे. मुंबई इंडियन्सने आतापर्यंत १० सामने खेळले आहेत. या १० सामन्यांमध्ये तब्बल सात सामन्यांमध्ये मुंबई इंडियन्सच्या संघाला सात पराभव पत्करावे लागले आहेत. पण या १० सामन्यांत मुंबई इंडियन्सला तीन विजय फक्त मिळवता आले आहेत. या तीन विजयांसह मुंबई इंडियन्सच्या संघाच्या खात्यामध्ये सहा गुण आहेत. मुंबईचा संघ हा या सहा गुणांसह पॉइंट्स टेबलमध्ये नवव्या स्थानावर आहे. पण मुंबईचा संघ नवव्या स्थानावर असला तरी त्यांचे आव्हान अजूनही कायम आहे. त्यामुळे आता हा सामना कोणता संघ जिंकतो, याकडे सर्वांचे लक्ष असेल.

अशाच अधिक बातम्या वाचण्यासाठी भेट द्या महाराष्ट्र टाइम्सला. ताज्या बातम्या, शहर, देश, अर्थ, क्रीडा, भविष्य आणि लाइफस्टाईल संदर्भातील सर्व बातम्यांचे अपडेट्स मिळवा. व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी TimesXP ला भेट द्या.

2024-05-03T14:25:36Z dg43tfdfdgfd