चेन्नईच्या विजयानंतर पॉइंट्स टेबलमध्ये झाला मोठा बदल, एकाच मॅचमध्ये दिले तीन संघांना धक्के

धरमशाला : चेन्नईच्या संघाने पंजाब किंग्सवर दमदार विजय साकारला. या विजयानंतर पॉइंट्स टेबलमध्ये मोठा बदल झाल्याचे पाहायला मिळाले आहे. कारण या विजयानंतर चेन्नईच्या संघाने पॉइंट्स टेबलमध्ये मोठी झेप घेतली आहे. त्यामुळे चेन्नईच्या चाहत्यांसाठी ही एक आनंदाची बातमी असणार आहे.

या सामन्यापूर्वीच चेन्नईच्या संघाने १० सामने खेळले होते. या १० सामन्यांमध्ये चेन्नईने पाच सामने जिंकले होते, तर पाच सामन्यांमध्ये त्यांना पराभव पत्करावा लागला होता. या पाच विजयांसह चेन्नईचे १० गुण झाले होते. त्यामुळे या १० गुणांसह चेन्नईचा संघ हा पाचव्या स्थानावर होता. या सामन्यात चेन्नईच्या संघाने दमदार विजय साकारला. त्यामुळे हा चेन्नईच्या संघाचा सहावा विजय ठरला. या विजयानंतर चेन्नईच्या संघाला २ गुण मिळाले. त्यामुळे चेन्नईच्या संघाचे आता एकूण १२ गुण झाले आहेत. या विजयासह चेन्नईच्या संघाने पंजाबला मैदानात धक्का दिला, त्यानंतर पॉइंट्स टेबलमध्ये सनरायझर्स हैदाराबाद आणि लखनौ सुपर जायंट्स या संघांना धक्के दिले आहेत. या सामन्यापूर्वी चेन्नईचा संघ पाचव्या स्थानावर होता आणि त्यानंतर त्यांनी या विजयासह थेट तिसरे स्थान गाठले आहे.

या सामन्यापूर्वी पंजाबच्या संघाने १० सामने खेळेले होते. या १० सामन्यांमध्ये पंबाजच्या संघाने चार विजय मिळवले होते, तर पंजाबच्या संघाला सहा सामन्यांमध्ये पराभव पत्करावे लागले होते. पंजाबने चार विजय मिळवले होते आणि त्यामुळे त्यांनी ८ गुण कमावले होते. या ८ गुणांसह पंजाबचा संघ हा आठव्या स्थानावर होता. या सामन्यानंतर पंजाबच्या पराभवात अजून एका सामन्याची भर झाली आहे. त्यामुळे पंजाबचे ११ सामन्यांत आता सात पराभव झाले आहे आणि गुणतालिकेत ते आठव्या क्रमांकावरच कायम आहेत.

चेन्नईच्या संघाने आता या विजयानंतर प्ले ऑफच्या दिशेने दमदार पाऊल टाकल्याचे पाहायला मिळाले आहे. कारण आता चेन्नईचे १२ गुण झाले असून अजून तीन सामन्यांत दोन विजय मिळवल्यास ते प्ले ऑफमध्ये पोहोचू शकतात. त्यामुळे आगामी तीन सामन्यांमध्ये चेन्नईचा संघ कशी कामगिरी करतो, याकडे आता सर्वांचे लक्ष लागलेले असेल.

अशाच अधिक बातम्या वाचण्यासाठी भेट द्या महाराष्ट्र टाइम्सला. ताज्या बातम्या, शहर, देश, अर्थ, क्रीडा, भविष्य आणि लाइफस्टाईल संदर्भातील सर्व बातम्यांचे अपडेट्स मिळवा. व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी TimesXP ला भेट द्या.

2024-05-05T14:03:14Z dg43tfdfdgfd