चेन्नई सुपर किंग्जला मोठा धक्का! दीपक चहरनंतर 'या' स्टार गोलंदाजाला दुखापत, मायदेशी परतला

चेन्नई सुपर किंग्जला मोठा धक्का बसला आहे. चेन्नई सुपर किंग्जचा स्टार गोलंदाजाना मायदेशी परतावे लागले आहे. डेथ ओव्हर स्पेशालिस्ट मथिशा पाथिराना हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीतून सावरण्यासाठी श्रीलंकेला परतला आहे. चेन्नईत पंजाब किंग्जविरुद्धच्या घरच्या सामन्याला मुकल्यानंतर मथिशा पाथिरानाने रविवारी धरमशाला येथे पंजाब किंग्जविरुद्धच्या घरच्या सामन्यालाही दुखापतीमुळे मुकावे लागले. तो श्रीलंकेत परतला आहे. श्रीलंकेच्या गोलंदाजाच्या अनुपस्थितीमुळे चेन्नई सुपर किंग्ज आणखी कमकुवत झाला आहे.

पाथीरानाने आतापर्यंत चेन्नई सुपर किंग्जसाठी दमदार कामगिरी केली आहे. या काळात त्याचा इकॉनॉमी रेटही ८ पेक्षा कमी होता. चेन्नईसाठीही ही वाईट बातमी आहे. कारण दीपक चहरही दुखापतीशी झुंजत आहे. चेन्नई सुपर किंग्ज सध्या लीगमधील महत्त्वाच्या टप्प्यावर असून गुणतालिकेत पाचव्या स्थानावर आहे. अशा परिस्थितीत दोन खेळाडूंची दुखापत ही चांगली बातमी नाही. दीपक चहरही लीगमधून बाहेर होण्याच्या मार्गावर आहे. अशा परिस्थितीत चेन्नई सुपर किंग्जसाठी काळ चांगला जात नाही असे म्हणता येईल.

आयपीएल २०२४ मध्ये पाथीरानाची कामगिरी

आयपीएल २०२४ मध्ये पाथीरानाने सीएसकेसाठी केवळ ६ सामने खेळले आहेत. ज्यामध्ये त्याने १३ विकेट घेतल्या आहेत. या हंगामात पाथीरानाचा इकॉनॉमी रेट ७.६८ होता. पाथीराना याआधी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्धच्या आयपीएल २०२४ च्या सलामीच्या सामन्यातही खेळू शकला नव्हता. मार्चमध्ये सिल्हेत येथे श्रीलंका आणि बांगलादेश यांच्यातील सामन्यादरम्यान त्याला हाताच्या पट्टीला दुखापत झाली होती. २१ वर्षीय वेगवान गोलंदाज मथिशा पाथिरानाने श्रीलंकेसाठी आतापर्यंत १२ एकदिवसीय आणि ६ टी-२० सामने खेळले आहेत. त्याच्या नावावर एकदिवसीय क्रिकेटमध्ये १७ आणि टी-२० मध्ये ११ विकेट्स आहेत.

दरम्यान आयपीएल २०२४ च्या ५३ व्या सामन्यात, पंजाब किंग्जचा सामना चेन्नई सुपर किंग्जशी झाला. धर्मशाला येथील हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर हा सामना खेळला गेला. पंजाबचा कर्णधार सॅम कुरनने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना चेन्नईने २० षटकांत ९ गडी गमावून १६७ धावा केल्या. प्रत्युत्तरात पंजाबचा संघ २० षटकांत नऊ गडी गमावून केवळ १३९ धावा करू शकला.

अशाच अधिक बातम्या वाचण्यासाठी भेट द्या महाराष्ट्र टाइम्सला. ताज्या बातम्या, शहर, देश, अर्थ, क्रीडा, भविष्य आणि लाइफस्टाईल संदर्भातील सर्व बातम्यांचे अपडेट्स मिळवा. व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी TimesXP ला भेट द्या.

2024-05-05T15:33:27Z dg43tfdfdgfd